स्वातंत्र्य

नमस्कार मित्रांनो!
      सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या भरपुर आणि मनापासुन शुभेच्छा!
भारत माता की जय!
      पण मित्रहो,
          प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय हो किंवा स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?
ज्या परिस्थितीतुन आपण जातोय, जी सामाजिक व्यवस्थेची हेळसांड मांडलीये, जी तोडफोड, जी जाळपोळ करुन सामाजिक मालमत्तेची हानी चालु आहे तिला एका अर्थाने प्रजासत्ताक भारत अथवा भारतीय राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य म्हणता येईल का?
      आजकाल दररोज वर्तमानपत्रात बातम्या येतात आज हा गाव बंद, काल इकडे जाळपोळ झाली, इथे महापुरुषांच्या पुतळ्यावर असं केलं!
अरे,
   चालवलंय काय आपण?
महापुरुषांनी जर हेच केलं असतं तर त्यांना आपण महापुरुष म्हणलंच का असतं?!
महापुरुष हे कधी जाती किंवा धर्मांमध्ये वाटले जाऊच् शकत नाहित!
हा जर ते वाटलेच जाणार असतील तर आपण त्यांना महापुरुष कशावरुन म्हणु? कदाचित ते नेते असु शकतात! जे एका स्वस्वार्थ किंवा लोकस्वार्थासाठी लढु शकतात.
पण एक महापुरुष पुर्ण देशाच्या आणि मग समाजाच्या हितासाठीच् जगतो!
          मग स्वातंत्र्य म्हणजे नक्की फक्त सत्तेतीलच् स्वातंत्र्य का?!
तर नाही!
            स्वातंत्र्य हे कोणा एका संज्ञेत बसवताच् येत नाही.
     शिवाजी महाराजांनुसार स्वातंत्र्य हे स्वराज्यात होते, मुघलांपासुन त्यांच्या मुल्यांचा सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक तिन्हींचा बचाव करण्यात होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनुसार स्वातंत्र्य हे चार्तुवर्ण व्यवस्थेतुन आपल्या बांधवांचे रक्षण करण्यात होते, त्यांच्यावरील अन्यायाचे निराकरण करण्यात होते म्हणुन आपण यांतील कोणाही महापुरुषाला चुकीचं म्हणु शकत नाही.
           आणि या महापुरुषांपैकी कधीच कोणीही अन्याय्य वा जनतेला हानीकारक किंवा सामाजिक मालमत्तेचे नुकसान कधीच् केले नाही.
     पण आपण त्यांचे अनुयायी त्यांचे नाव घेऊन जाळपोळ, तोडफोड, दंगली करुन त्यांना बदनाम करत नाही आहोत का?
       हे कितपत योग्य आहे??
आणि
      हे करुनच् काय साध्य होतं का आपल्याला?! जिथे आपण शांततापुर्व मार्गाने निशेध करुन आपल्या मागण्या पुर्ण करु शकतो तिथे हिंसेची गरजच् काय?
की अजुनही भारत प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्यात नाहिये?

टिप:- या लेखातील विचार हे एका मानसिकतेबद्दलचे माझे विचार आहेत जर कोणाला त्यामुळे दुःख झाले तर मी मनापासुन माफी मागतो!

Comments